पंढरपूर // प्रतिनिधी
संपूर्ण जगामध्ये मागील पाच महिन्यापासून कोरोना या महाभयंकर रोगाने हाहाकार माजला आहे. भारतामध्ये सुद्धा याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कोरोना ग्रस्त झालेला देश आहे. भारतामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा 60 टक्क्यांच्या आसपास पोहोचलेला आहे. अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण आढळतात. त्याच प्रमाणे आपला सोलापूर जिल्हा सोलापूर शहरांमध्ये आज तीन हजाराच्या वर पेशंट गेलेले आहेत. कोणतीही परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. सर्व दवाखाने आणि हॉस्पिटल्स फुल झालेले आहेत.त्याच्यापासून अगदी जवळ असलेल्या आपल्या पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये सुद्धा कोरोना या महारोगाने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण प्रशासन रात्रंदिवस एक करून या महारोगापासून पंढरपूरच्या शहरातल्या लोकांना वाचवत होते .परंतु ऐन आषाढी वारीच्या आधी दोन दिवस शहरात असलेला प्रॉपर रुग्ण आढळला आणि शहरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. आज या घडीला पंढरपूर शहरांमध्ये 25 च्या आसपास नवीन रुग्ण आढळले आहेत. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये शहरांमध्ये एक ही सुसज्ज रुग्णालय उभा करता आले नाही आजपर्यंत पंढरपूर शहरांमध्ये एकही रुग्ण नव्हता अशा वेळेस राजकारण आपल्याला पाहायला मिळाले परंतु मागील १५ दिवसांपासून शहरांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. स्वतः पालकमंत्र्यांनी येऊन पंढरपूरचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्री आले, आरोग्यमंत्री आले परंतु आजतागायत या कोरोना ला रोखण्यासाठी व रुग्णालयासाठी कोणीही पुढे आले नाहीत. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या भक्तांसाठी व गावातील लोकांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. एम आय टी सारख्या मोठ्या संस्थेने वाखरी येथे स्वतःची बिल्डिंग कोरोणासाठी उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला विलगीकरण पक्ष म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळाल्या नंतर हळूहळू तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचे वतीने त्या ठिकाणी उपचार केले गेले आहेत. आज पर्यंत जे कोण त्याठिकाणी अॅडमिट झाले; त्या सर्वांवर योग्य उपचार करून त्या ठिकाणी बरा झाला पंढरपूर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाच्या सहकार्यामुळे आज पंढरपूर शहरांमधले सर्व रुग्ण आतापर्यंतचे बरे होऊन घरी गेलेले आहेत व आताही त्या ठिकाणी पंधरा च्या वर रुग्ण त्या ठिकाणी आहेत परंतु या राजकीय संवादांमध्ये शहराला स्वतःचा असा एकही कोविड हॉस्पिटल त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही हीच खेदाची बाब आहे स्वतः मुख्यमंत्री येऊन गेले गृहमंत्री आरोग्यमंत्री आले पालकमंत्री आले येथील आमदार यांनी प्रयत्न केले परंतु कोणतेही पंढरपुरकरांना हॉस्पिटल आपल्याला मिळू शकले नाही त्याच्याबद्दल अक्षरशः याची लाज वाटते कारण पंढरपूर सारख्या शहरांमध्ये एकही कोविड रुग्णालय नसावे याठिकाणी पूर्णवेळ त्या रुग्णांना उपचार मिळतील कोणतेही असे केंद्र नाही या ठिकाणी वर्गीकरण कक्ष वेगळा आणि कोविड रुग्णालय असे करू शकलो नाही देवा पांडुरंगा लोकांना व प्रशासनाला सुबुद्धी दे व लवकरात लवकर पंढरपूर शहर यासाठी सुसज्ज असे रुग्णालय व करण्याची प्रेरणा देऊ अशी एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो
शाम प्रभू गोगाव,पंढरपुर

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.