सोलापूर // प्रतिनिधी
आज शहरातील मास्क न घालणे ,हँडगलोज न वापरणे,रस्त्यावर थुकणे, कचरा टाकणे आदी बाबतीत आज दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.आज एकूण 231 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून.त्याची एकूण 31850 रु दंड वसुल..
सोलापूर--सोलापूर शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.आयुक्त पी.शिवशंकर साहेबांनी शहरातील किराणा दुकानदार,चार चाकी गाडीवरील भाजी विक्रेते,सार्वजनिक ठिकाणी जे सामान्य व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही आणि ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणच्या व्यापारी बंधूंनी मास्क व ग्लोज घालणे बाबतआदेश पारीत केले आहेत.जे व्यापारी आदेशाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
त्या नुसार ज्या विक्रेत्यांनी मास्क लावले नाहीत तसेच जे सामान्य व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही आशा ठिकाणी वेगवेगळ्या विभागीय कार्यालया कडील आरोग्य निरिक्षका मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
झोन क्र 1-- 33व्यक्ती 4800 रु दंड वसुल
झोन क्र 2 --25 व्यक्ती 3100 रु दंड
झोन क्र 3 -- 35 व्यक्ती 5400 रु दंड
झोन क्र 4 --16 व्यक्ती 3600 रु दंड,
झोन क्र 5 -- 35 व्यक्ती 3600रु दंड,
झोन क्र 6 --33 व्यक्ती 4250रु दंड,
झोन क्र 7 --40 व्यक्ती 5000रु दंड,
झोन क्र 8--14 व्यक्ती 2100 रु दंड,
असे आज दि.09/07/2020रोजी रक्कम रुपये 31850/-इतका दंड वसुल करण्यात आला. जे लाेक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांचेवर अत्यंत कडक कारवाई करणेबाबत आदेश देणेत आले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.