सोलापूर शहरात दहा दिवस संचारबंदी करा; मनपा आयुक्तांची मागणी



सोलापूर // प्रतिनिधी 

संचारबंदी लागू केल्याने कोरोना संपणार नाही. लोकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स, गर्दी न करणे अशी काळजी घेतल्याशिवाय संसर्ग कमी होणार नाही, लोकांची ही मानसिकता बदलण्याची आपली जबाबदारी आहे अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर शुक्रवारी दुपारी मांडली.
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सोलापुरात संचारबंदी लागू करावी का या विषयावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महापालिकेतील गटनेते आमदार व अधिकाºयांची जिल्हा नियोजन भवनात बैठक घेऊन मते जाणून घेतली. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आरोग्य विभागाने गांभीर्याने चाचण्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ चाचणी घेतल्यानंतर लोकांना घरी सोडून दिले जाते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी लोक फिरत असतात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी कसा होणार. महसूल प्रशासनाने महापालिकेलासहकार्य करण्याची गरज आहे. गरिबांसाठी सुविधा देण्यात याव्यात अशी सूचना केली. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget