पंढरपूर // प्रतिनिधी
धाराशिव साखर कारखाना युनिट१ उस्मानाबाद येथील नवव्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कारखान्याचे संचालक दिलीप (बापू) धोत्रे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह पार पडले.
उस्मानाबाद जिल्ह्य़ात यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण झाली असून यंदा पाऊसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. याहंगामात कारखाने लवकर सुरू करण्यासाठी शासनाचे धोरण असणार आहे.त्यामुळे कारखान्याची कामे पुर्णतः झालेली आहेत. ह्या हंगामात उच्चांक गाळप करण्याचा मानस आहे.
कोरोनाच्या दिवसामध्ये प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन करून कारखान्यातील कामे पूर्ण करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुर्णतः केलेल्या कामाचे कौतुक केले.असे अभिजीत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी कार्तिक पाटील, धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे, रामभाऊ रांखुडे, संदीप खारे, दिपक आदमिले, जनरल मॅनेजर हनुमंत पाटील, चिफ इंजिनीअर कोळगे, चिफ केमिस्ट तांबारे, शेती अधिकारी खामकर व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.