वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पत्र लिहिण्याचे कारण मी आपला परवा फेसबुक लाईव्ह बघितला. आपण दिलेली दूधदर वाढीच आव्हान मनाला पटले. खरंतर तुमच्यानंतर बोलणारे एक दिवसात खूप तयार झाले. आंदोलनाची पहिली हाक तुमची. तसा विचार केला तर तुम्हाला तरी या आंदोलनाची काय गरज होती. सहज पवार साहेबांनी आता आमदारकी बहाल केली होतीच की. तुम्ही सत्तेत असताना ही आंदोलन करता म्हणून तुमच्यावर नाराज असणा-यांची संख्या खूप आहे साहेब. पण तुमचे रक्तच खूप वेगळे, तुम्हाला ते कधीच शांत राहू देत नाही.
स्वाभिमानीला पक्की विचारधाराच नाही म्हणणारे कैक सापडतील, पण आमच्या सारख्या मनापासून प्रेम करणा-या माणसाला स्वाभिमानी म्हणजे फक्त शेतकरी हिताची विचार करणारी संघटना हे पक्क माहित आहे. रक्ताच पाणी करुन आम्ही दूध विकत आहे. आताच्या घडीला अवघा 18 रुपये दूधदर आहे. साधी एक लिटर दूध पिशवी घ्यायची म्हटलं तरी शहरात सहज 42 रुपयांच्या पुढे आहे. आमच्या एका लिटरचे किती पदार्थ करुन तुम्ही शेवटी पाणीच 42 रुपयांनी विकता. मुळात दूधदर वाढीचा मुद्दा प्रत्येक वर्षी पेटतोच, सरकार तत्पुरते आश्वासन देते आणि आंदोलन शांत करते हे कित्येक दिवस आम्ही बघत आलोच आहे. पण आंदोलनाची पहिली हाक ही कायम राजू शेट्टीची राहिली आहे. माझ्यासारख्याला सुध्दा थेट बांधावरुन लिहिवे वाटाते ते फक्त या माणसांमुळे.
छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला असणारी माणसं खूप सध्या घरातील आहेत. निष्ठा, प्रेम करणारी आहेत. साहेब कदाचित आपले आंदोलन हे 21 जुलैपासून चालू होत आहे. आपल्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. माझ्या बापाने रात्रीच टिव्हीत बातमी बघितली तेव्हा आता खरी दूधवाढ होणार म्हणून हातावर टाळीही दिली इतका तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत काम करणारी कित्येक माणसं तुमच्याकडे आशेने बघत आहात. कित्येकांने आंदोलनांची हाक दिली तुम्ही मात्र तुमचे आंदोलन प्रमाणिकेतेने पार पडता म्हणून आज ही तुमच्यावरील विश्वास तूसभर ही कमी झाला नाही. आम्हाला माहित आहे सत्तेत असताना ही सत्तेला आव्हान देण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे.
साहेब आपल्या आंदोलनाची दखल या मीडियाने घेऊ अथवा नाही घेऊ आमच्या सारखी युवा शेतकरी पोरं मात्र नक्की घेत आहेत. आपण दिलेल्या या आंदोलनाचा खारीचा वाटा उचलण्या इतकी ताकद आमच्यात आहे. 21 जुलै पासून होणा-या आंदोलनात दूधदर वाढीची मागणी आपण नक्की पूर्ण करुन घ्यायल अशी आशा आहे.
रमेश चव्हाण
शेतकरी अरळी ता- मंगळवेढा

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.