भालचंद्र पाटलांच्या निधनानंतर कुटुंबाची सांत्वन भेट !
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते भालचंद्र पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माळशिरसमध्ये जाऊन पाटील कुटुंबाची भेट घेतली. भालचंद्र पाटील यांचे पुत्र रमेश पाटील यांना भेटून सांत्वन केले. पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.
शरद पवार हे माळशिरस तालुक्यातील कन्हेरमध्ये रमेश पाटील यांच्या घरी गेले होते. रमेश पाटील यांचे वडील भालचंद्र पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे पवारांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. भालचंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, बळीराम काका साठे आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.