वृत्तसंस्था // प्रतिनिधी
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता नेहमी शिवरत्न बंगल्यावर दौरा असतो मात्र माळशिरस येथील शिवतीर्थ बंगला येथे राजकीय खलबते झाली असल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे या भेटीकडे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यांच्यासोबत महा विकास आघाडी सरकारमधील आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तामामा भरणे उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीसाठी सोलापूर येथे दौरा असताना माळशिरस मार्गे शरदचंद्रजी पवार साहेब सांत्वनपर निष्ठावान कार्यकर्ता रमेश पाटील यांच्या निवास्थानी सांत्वनपर भेटीनंतर प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांना पवार साहेब यांनी स्वतःच्या गाडीमध्ये बसवून अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर माळशिरस येथील मेरिडियन एक्झिक्यूटिव्ह हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शिवतीर्थ बंगला या निवासस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख या उभय बंधूंच्या शिवतीर्थ बंगला येथे आवर्जून पवार साहेब यांनी भेट देऊन चहा नाश्त्याचा आस्वाद घेत अनेक राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यावेळेस सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीरामकाका साठे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव पाटील माळशिरसचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव युवा नेते संकल्प डोळस माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे उपाध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील श्रीशंकर कारखान्याचे माजी संचालक विलास आद्रट सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे सर देशमुख हंसराज माने पाटील, युवा नेते सुजयसिंह माने पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सहसचिव करण पाटील एडवोकेट अभिषेक पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ आप्पासाहेब वाघमोडे, राजाभाऊ पवार, शामराव देशमुख, नवनाथ देशमुख मान्यवरांसह देशमुख परिवारातील इस्लामपूर गावचे माजी सरपंच साहेबराव देशमुख काकासाहेब देशमुख, माळशिरस पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. शुभांगी देशमुख इस्लामपूरच्या माजी सरपंच सौ कुंदाकिनी देशमुख राहुल देशमुख सुहास देशमुख यशराज देशमुख कीर्तिराज देशमुख प्रफुल्ल देशमुख ऋतुराज देशमुख प्रज्ञा देशमुख आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यांमध्ये पवार साहेबांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले होते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांना शरद चंद्र पवार साहेब यांनी कण्हेर ते माळशिरस व माळशिरस येथून सोलापूरकडे कोरोना आढावा बैठकीसाठी स्वतःच्या गाडीमध्ये बसून घेऊन गेल्याने माळशिरस तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लोकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.
उद्या जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार नगरसेविका आणि अधिकाऱ्यांसोबत ते जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी बैठक घेतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केलं आहे.
शरद पवार रविवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी बारामतीतील ‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
शरद पवार हे सोलापूरमधील ‘कोरोना’च्या परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारी आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.