महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा:- शिवबुध्दचे संदिप मुटकुळे



पंढरपूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अधिपत्याखाली असणा-या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, लोकशाहरी आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती जमाती विकास महामंडळ या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी पुर्णत ठप्प झाले असून या महामंडळाना शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी केली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शासनाला लाॅकडाऊन करावे लागेल त्यांचा परिणाम सर्व क्षेतातील व्यवहारांवर झाला असून अनेकांना आपल्या नोक-यावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली असल्याने शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे हे म्हणाले.
कोरोनाच्या कालावधीत ज्यांच्या नोक-या गेल्या, लाॅकडाऊनमुळे छोटे मोठे उद्योग व्यवसाय अडचणी आले आहेत.अशांना भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे.त्यासाठी शासनाने या महामंडळामार्फत मागासवर्गीय घटकातील विविध जाती जमातीतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.असे शिवबुध्दचे संदिप मुटकुळे यांनी केली आहे. 
यापुर्वी महामंडळाची कर्ज माफी झाली होती.त्यावेळेपासून पाहिजे.त्या प्रमाणात शासनाने या महामंडळाना निधी उपलब्ध करून दिलेला नाही.त्यामुळे ही महामंडळे अडचणीत आली आहेत.केंद्र व राज्य शासन या मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी आर्थिक निधी उपलब्ध करून देते मात्र गेल्या अनेक वर्षापासून महामंडळाकडून पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जात नसेलतर मागासवर्गीय समाजासाठी तरतुद केलेला निधी कोठे जातो असा सवालही शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी उपस्थित केला आहे.राज्यभरात दलित.  
ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून हा समाज आर्थिक व सामाजिक दृष्टया अत्यंत मागे आहे.
या समाजाला महामंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून संचालक मंडळ नेमणूक केलेल्या नाहीत.त्या नेमणूकाही कराव्यात व महामंडळाच्या विकासाला चालना द्यावी.अशी मागणी शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget