राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा शिवबुध्दचे संदिप मुटकुळे


पंढरपूर // प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य शासनाने महाविद्यालय अंतर्गत असलेल्या परिक्षा रद्द केल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करावी.कोरोना विषाणूच्या पाश्वभुमीवर राज्य शासनाने महाविद्यालय अंतर्गत असलेल्या यावर्षीच्या परिक्षा रद्द केल्या आहेत.त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी परत द्यावी.अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.राज्यातील एका शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत या महाविद्यालयाकडून लाॅकडाऊन पुर्वी अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी परिक्षा फी घेतलेली आहे.या सर्व महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागातील जवळपास 2.५लाख विद्यार्थी आहेत.या सर्व विद्यार्थ्याची सरासरी १३.५०कोटी रूपय परिक्षा फी आपल्या विद्यापीठाकडे जमा झालेली आहे. राज्यातील विविध विद्यापीठमध्ये असे लोखो विद्यार्थी असून त्या विद्यार्थ्यांची फी माफ होणे गरजेचे आहे.सर्व विद्यार्थी शेतकरी,शेतमजुर, कामगार,तसेच गरीब सर्वसामान्य वर्गातील जनतेची मुले व मुली आहेत.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने सध्या सर्वत्र मंदीची लाट व सावट सुरू आहे.लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत.कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे.शेतमालाला व दुधाला भाव नाही त्यातच राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या अंतिम परिक्षा रद्द केल्या आहेत.परिक्षाच रद्द झाल्याने राज्यातील सदर परिक्षेची जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळले.म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व  विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करावी असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget