विद्यार्थयाचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परिक्षा नको:- शिवबुध्दचे संदिप मुटकुळे


पंढरपूर // प्रतिनिधी 
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थयाच्या परिक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थयाच्या जीव धोक्यात घालून वैद्यकीय परिक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या याव्यात
प्रथम द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नाॅन सर्टिफाइंट परिक्षा पुढील सुचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही. यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्याची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी.कोविड-१९चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे.पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी   सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच १५चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्याच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात. मात्र कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचन निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा.अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना देण्यात याव्यात.कारण वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून वैद्यकीय परिक्षा घेण्या याव्यात असे आव्हान शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget