माऊली नगर उद्यान व नाना नानी पार्क चे उद्घाटन



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
आटपाडी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पोस्टा लगत उद्यान व नाना-नानी पार्क चे उद्घाटन तालुक्याचे नेते अध्यक्ष श्री. तानाजीराव पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. विद्याताई देशपांडे व लोकनियुक्त सरपंच सौ.वृषालीताई धनंजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी आटपाडी तालुका शिवसेनाप्रमुख श्री. साहेबराव पाटील, वरदान उद्योग समूहाचे संचालक ॲड. श्री धनंजय पाटील, इंजिनिअर श्री. राजेश नांगरे, डाॅक्टर श्री. जीवन श्रीनाथ पाटील, युवा सेना अध्यक्ष श्री संतोष पुजारी, ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब मेटकरी,  श्री. प्रकाश मरगळे, श्री. अरविंद चव्हाण, श्री सुहास देशमुख, श्री. कैलास उर्फ दिलीप पाटील, श्री. संजय भिंगे, नाभिक संघटनेचे  अध्यक्ष श्री. कल्याणराव काळे, श्री. नंदू लोहार, तिरुपती कलेक्शनचे मालक श्री विलासराव गिड्डे, श्री. अजय गिड्डे, श्री संदेश पाटील, श्री रमेश चव्हाण, श्री. शाम देशपांडे, श्री. अजित देशपांडे, श्री. सुशांत मोरे, श्री. विजय तारळेकर उपस्थित होते.

आटपाडी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी बाहेर गावाहून एखादा पाहुणा मुलांबाळांसह आला तर किंवा गावातील लहान मुलांना खेळायला बागडायला  एकही गार्डन नव्हती तसेच वृद्ध नागरिकांसाठी नाना-नानी पार्क नव्हते त्यामुळे आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी लोकनियुक्त सरपंच निवडणुकीच्या वेळेस गावातील सुजान जनतेला गावांमध्ये गार्डन व नाना नानी पार्क उभारणी करणार म्हणून जाहीरनाम्यामध्ये जाहीर लिहून दिले होते त्या प्रमाणे सरपंचानी माऊली नगर येथे वचनपूर्ती पूर्ण केली.

जेवढ्या विश्वासाने गावातील जनतेने निवडणुकीत निवडून देऊन गावाची जबाबदारी सोपवली तेवढ्याच ताकतीने जबाबदारी पार पाडण्यासाठी जाहीरनाम्यातील दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी आमदार श्री. अनिल भाऊ बाबर व  अध्यक्ष श्री. तानाजीराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आटपाडी येथील
तूर्तास 3 ठिकाणी पैकी,

1) पोस्ट ऑफिस लगत असलेल्या सरकारवाडा येथे माऊली उद्यान व नाना नानी पार्क

2) स्टेट बँके जवळ असलेल्या सुरेश इंडेन गॅस शेजारी संभाजी गार्डन व नाना नानी पार्क

तसेच 

3) सांगली रोड ला असलेल्या सावंत हाॅस्पीटल च्या शेजारी असणाऱ्या सार्वजनिक जागेत *चैतन्य गार्डन व नाना नानी पार्क

करण्याचे काम प्रत्यक्षात चालु करून त्यापैकी माऊली नगर  येथील  गार्डन व नाना नानी पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोपाळा वगैरे साहित्य तसेच वृद्ध नागरिकांना व इतरांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिम चे साहित्य बसवून महत्त्वाची एक वचनपूर्ती केली त्यामुळे माऊली नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व सरपंचांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget