पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारमधील ऊर्जामंत्री मा. नितीन राऊत यांनी गेल्याच महिन्यात असे जाहीर केले होते की कोणाला आहे ज्यादा चे वीजबिल येणार नाही किंवा कोणाकडूनही आम्ही ज्यादा बिलाची वसुली करणार नाही त्या अनुषंगाने गेल्या जून महिन्यातील सर्व महाराष्ट्रातील वीजग्राहकांना (घरगुती व व्यावसायिक) वीज बिलाचा जबरदस्त शॉक दिला असून याबद्दलच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक पत्र लिहून असे कळवले आहे की,
कोरोनाच्या ह्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसाव्यात म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते.
खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण केव्हा बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीज बिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जिबिला ग्राहकांना पाठविली गेली आहेत ती शब्दश सामान्य माणसांचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी विल्ल पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यात विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्याच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या मध्ये मारण्यात येत आहे. तफावती च्या नावाखाली बिलांच्या जर कमाल गेले आहेत त्यांवरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल. त्यात टाळेबंदीमुळे व्यवसायिक आस्थापन देखील गेले 3 महिने बंद होती तरीही त्यांना सरकारी विहीर बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे आणि व्यवसाय ठप्प झाली आहेत अनेक ठिकाणी पगार कपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नोकर कपात सुरू केली आहे अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना तिथेही विज बिल म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण आहे.
कोरोना ची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील घरातील पण ह्या आशा विषयावर जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.