केंद्राकडून महाराष्ट्राला १९ हजार कोटींचा जीएसटी परतावा


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारडून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत  आहे.  केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आलायं. जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये देण्यात येत आहेत. २०१९-२० चा हा जीएसटी परतावा देण्यात आलाय.
  देशात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १ लाख ६५ हजार कोटींचा परतावा देण्यात आलाय. केंद्राकडून आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिलीय. यामध्ये महाराष्ट्र, युपी आणि बंगालमध्ये टेस्टिंग क्षमता १० हजारांनी वाढवत असल्याचे ते म्हणाले. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget