दामाजी कारखान्याचे रोलर पुजन संपन्न.


सोलापूर // प्रतिनिधी 
श्री।संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ गळीत हंगामाकरिता रोलर पुजनाचा कार्यक्रम सोमवार दि।२७/७/२०२० रोजी सकाळी १०।३० वाजता  संचालक श्री. लक्ष्मण एकनाथ जगताप, यांचे शुभहस्ते संपन्न झाला
रोलर पुजन प्रसंगी बोलताना कारखान्याचे संचालक श्री।लक्ष्मण जगताप म्हणाले कि, साखर दामाजी कारखान्यावर येणा-या अडचणी सोडविणेसाठी कारखान्याचे चेअरमन श्री. समाधान आवताडे,तालुक्याचे नेते श्री।बबनराव आवताडे  व संचालक मंडळ यांनी केलेले प्रयत्न ,ऊस उत्पादक सभासद ,ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचा-यांचे सहकार्यमुळे मागील हंगाम चालु करु शकलो.  मागील हंगामात सोलापुर जिल्हयातील दोन-तीन वगळता सर्वच कारखाने बंद होते. चालु राहिलेल्या कारखान्यामध्ये आपल्या कारखान्याने १,६२,००० मे।टनाचे क्रशिंग केलेले आहे। येणा-या हंगामाकरिता सुरुवातीपासून पाऊस समाधानकारक होत असल्यानेल्याने कार्यक्षेत्रातील ऊसाची वाढ चांगली झाली आहे। कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील नवीन लागवडीच्या नोंदी ११५० हेक्टर पर्यत झालेल्या असुन सध्याही मोठया प्रमाणात ऊस लागण सुरु आहे. येणा-या सन २०२०-२१ च्या हंगामाकरिता आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा भरतीचे  काम अंतीम टप्प्यात असुन गळीत हंगामात ५,५०,००० मे।टन ऊसाचे गाळप करण्याचा मा।संचालक मंडळाचा मानस आहे।
कोरोना संसर्गामुळे मशिनरी दुरुस्तीसाठी मागील दोन महिन्यात अडचणी आल्या होत्या कामगारांचे सहकार्याने सर्वच कामे वेगाने सुरु आहेत. ऑगस्ट अखेर मशिनरी दुरुस्ती व ओव्हर ऑयलिंग करुन सप्प्टेंबरमध्ये मशिनरी गळीत करण्यासाठी तयार राहिल असा विश्वास प्राकार्यकासरी संचालक तथा वर्क्स मॅनेजर श्री। सुहास शिनगारे यांनी व्यक्त केला.  
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक राजीव बाबर, बाळासोा शिंदे, तसेच कारखान्याचे परचेस ऑफीसर भारत निकम, शेती अधिकारी रमेश पवार, चिफ अकौेंटंट रमेश गणेशकर, चिफ केमिस्ट संतोष माळवदे, स्टोअर किपर उत्तम भुसे, लेबर ऑफीसरस आप्पासो शिनगारे, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, कार्यालयीन अधिक्षक दगडु फटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget