पंढरपूर // प्रतिनिधी
दिनांक 30 पासून क्षेत्र पंढरपूर येथे आयुक्त कार्यालया समोर विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून आमरण उपोषण चालू होते या आमरण उपोषणाला ह भ प अरुण महाराज बुरघाटे, जगन्नाथ महाराज देशमुख, गणेश महाराज शेटे ,तुकाराम महाराज भोसले, विवेकानंद महाराज टेंभूकर ,हनुमंत बापू भोसले ही महाराज मंडळी उपोषणाला बसलेले होती
उपोषणाच्या दुसऱ्या दिवसाला विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी गणेश महाराज शेटे आणि जगन्नाथ महाराज देशमुख यांनी आमदार श्री रोहित दादा पवार यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली पंढरपूर येथे संत नामदेव महाराज यांच्या वंशजानी वर गुन्हे दाखल झालेले आहेत हे मागे घेण्यात यावे आणि रोहित दादा पवार यांनी तातडीने सोलापूर येथील जिल्हाधिकारी साहेब यांना सांगून नामदेव महाराज यांच्या वरील गुन्हे मागे घ्यावे ही विनंती केली
आणि रोहित दादा पवार यांनी आम्हाला सांगितल्या नुसार त्वरित गुन्हे मागे घेण्यात येतील त्यानंतर प्रांत अधिकारी श्री ढोले साहेब व पंढरपूर पोलिस अधिक्षक श्री पवार साहेब यांनी विश्व वारकरी सेनेच्या उपोषण करत्यांना विनंती केली की पंढरपूर मध्ये कोरोना पेशंट अतिशय झपाट्याने वाढत आहेत आणि येत्या दोन दिवसां मध्ये पंढरपूर 8 दिवसाकरीता लोक डॉन होनार आहे म्हणून आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपले उपोषण मागे घ्यावेही विनंती केली असता पुन्हा श्री जगन्नाथ महाराज देशमुख आणि गणेश महाराज शेटे यांनी रोहित दादा पवार यांच्याशी संपर्क साधला आणि रोहित दादा पवार यांनी मोबाईल द्वारे माहिती दिली माझ्या अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून नामदेव महाराजांच्या वंशजांना वरील गुन्हे मागे घेण्या करिता मी परिपूर्ण प्रयत्न केला भजन-कीर्तन परवानगी हा विषय मुख्यमंत्री साहेबांचा आहे आणि मी येत्या मंगळवारी मुख्यमंत्री साहेब यांना या विषयावर चर्चा करून वारकऱ्यांच्या भावनेचा विचार करता त्यांना भजनाची परवानगी देण्यात यावी ही विनंती करणार आहोत सोबतच कोरोना संकटामुळे आपण वारकऱ्यांनी ही सरकारला सहकार्य करावे आणि आपले उपोषण मागे घ्यावे मी वारकऱ्यांचा पाईक आहो माझ्याकडून मी परिपूर्ण वारकऱ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिल्यामुळे आज दिनांक 31 तारखेला पंढरपूर येथे संत नामदेव महाराज पायरी जवळ प्रांत धिकारी श्री ढोले साहेब व पंढरपूर पोलीस अधीक्षक श्री पवार साहेब आणि नायब तहसीलदार साहेब यांच्या हातून नारळ पाणी पाजुन अमरण उपोषण सोडण्यात आले
संत नामदेव महाराज यांच्या वंशजानी वरील गुन्हे मागे घेत असल्यामुळे आणि उपोषणातील प्रमुख मागणी मान्य झाल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी मंडळी मध्ये फार मोठे एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
या संघर्षाला जे यश मिळाले आहे ते फक्त विश्व वारकरी सेनेचे नसून महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे, खंबीरपणे सर्व वारकरी संघटनांनी पाठिंबा दिला त्यांचे सर्व पत्रकार मंडळींचे आणि वंचित बहुजन आघाडी श्री प्रकाश भाऊ आंबेडकर साहेब या सर्व मंडळी मुळे हा विजय झालेला आहे अशी माहिती शगणेश महाराज शेटे व जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे
विश्व वारकरी सेना भारत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.