पंढरपूर // प्रतिनिधी
सर्वसामान्य गरजू नाभिक समाजातील बांधवांना सलुन चेअरसाठी (खुर्ची) निधी लवखरच लाभार्थाच्या खात्यात जिल्हा परिषद सेस फंडातुन जमा होणार आसल्यची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
सध्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अर्थिक कमकुवत झालेल्या नाभिक समाजाच्या बांधवांना यामुळे दिलासा मिळाला आहे. केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेल्या लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद ठेवली होती.
हातावर पोट असणा-या नाभिक समाज व त्याच्या कुटुंबियांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
ग्राहक व केशकर्तनकार, कारागीर यांचा थेट जवळचा संबध येत असल्यामुळे शासनाने इतर दुकाने चालू केली तरी केशकर्तनालयाची दुकाने बंदच ठेवली होती.
आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असलेल्या नाभिक समाजाच्या बांधवाना याचा लाभ होईल असेही यावेळी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले.
सन 2019-20 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद सेस फंडातुन ग्रामीण भागातील केशकर्तनालयासाठी साहित्य देणे या लेखाशिर्षातंर्गत सलुन व्यवसायातील लाभार्थां ना खुर्ची खरेदीसाठी निधी मंजूर झाला असुन तो लवकरच संबंधिताचे खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.