सामाजिक अंतर, सॅनिटायजर व मास्कचा वापर करणे अत्यावश्यक - पोलीस अधीक्षक मनोज पाटील
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये कोरोना विषाणू, प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद या विषयावर वेबिनार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा. मनोज पाटील ( पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) हे होते. या ऑनलाईन वेबिनारमध्ये १५० हुन अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या वेबीनारमध्ये महाराष्ट्र ट्रेनिंग व प्लेसमेंट असोसिएशनचे डॉ. माधव राऊळ हेही सहभागी झाले होते. संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर हेही यावेळी सहभागी होते. त्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सांगोला सारख्या ग्रामीण भागात असलेल्या उद्योग क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. यावर मा. अधीक्षक साहेब उत्तर देताना म्हणाले कि, कोणताही उदयोग बंद न करता कामकाज कसे करता येईल हे पहिले पाहिजे, यासाठी सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायजर व मास्कचा वापर करणे हे खूप महत्वाचे आहे. या सर्व अटींचे पालन करून कामकाज सुरु ठेवता येईल. यावेळी विद्यार्थी व अधीक्षक यांच्यामध्ये अनेक प्रश्नावर सुसंवाद घडून आला. अनेक समाधानकारक उत्तरे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी केले. अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी समन्वयक प्रा. रामराव सुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थी समन्वयक स्वेता नामदे यांनी केले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.