श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचला कोरोना




पंढरपूर // प्रतिनिधी

आज हाती आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरातील सात नव्या रुग्णांमध्ये भर पडली असून यामध्ये पंढरपूर शहरातील येळे वस्ती लिंक रोड परिसर त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील खर्डी व करकम येथे सुद्धा कोरोना चे रुग्ण सापडले आहेत यामध्ये महत्त्वाची बातमी अशी की दोन दिवसापूर्वी देवशयनी आषाढी एकादशी चा सोहळा पंढरपूर शहरामध्ये पार पडला त्यामध्ये शासनाच्या परवानगीने पंढरपूर शहरात आलेल्या काही मोजक्या पालक या चा समावेश आहे यामध्ये दोन दिवसापूर्वी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसताना आज अचानक पणे पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिरातील एका सुरक्षा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण होते. हे आश्चर्यजनक आहे.
त्यामुळे आता विठ्ठलाच्या मंदिरात सुद्धा कोरोना चा शिरकाव झाला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे सर्व मंदिर परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या कोरणा पॉझिटिव्ह निघालेल्या सुरक्षा रक्षकाला कोरोनटाईन करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
आता या कोणाचा विठ्ठल मंदिराभोवती प्रवेश झाल्यामुळे आता विठ्ठल मंदिर व पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी श्री पांडुरंगा पुढे गा-हाने मांडले असून श्री विठ्ठला आमच्या पंढरपूरला वाचव अशी आर्त हाक  सर्व पंढरपूरकरातून ऐकायला मिळत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget