राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील जैनवाडी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.

 
पंढरपूर // प्रतिनिधी
या उपक्रमामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर व सत्कार समारंभाचे आयोजन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपकदादा पवार यांचेतर्फे करण्यात आले होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत भविष्यातील करीयर संदर्भातील इच्छा व्यक्त केल्या.त्याअनुषंगाने मा.योगेश साळवेसो विक्रीकर अधिकारी मुंबई यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर

योग्य करीयर निवड व करीयरच्या विविध संधी

याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.तसेच पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी,पालकांचा त्याग याची जाणीव ठेवुन उज्वल यश संपादन करावे असे आवाहन केले.
यावेळी महादेव लिंगडे सर ,उपसरपंच मच्छिंद्र गोफणे,ग्रामसेवक ढोपे,सतिश साळवे, अनिल शिंदे ,जालींदर कोळेकर,विजय शिंगटे , सुहास पवार,गणपत दासरे,महादेव शिंगटे उपस्थित होते.
प्रास्तविक व सुत्रसंचालन राजकुमार जमदाडे सर यांनी केले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget