पंढरपूर // प्रतिनिधी
देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातला आहे. रोज कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आंणि यातून मृत्युमुखी होणा-यांची संख्या देखील जास्त आहे.दरम्यान या कोरोनामुळे आज समजात कोणी सख्खा किंवा जवळचा राहिला नाही. कारण रात्री झोपेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी नातेवाईक यांनी पाठ फिरवली शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची ह्दयद्रावक घटना देशातील बेळगावाच्या अथणी गावात घडली.कोरोनामुळे समाजातील माणुसकी केव्हाच मेली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी चार जण लागतात.पण कोलोनाच्या दहशतीमुळे चार लोक देखील जवळ येत नाहीयेत.अथणी येथील सदाशिव हिरट्टी या ५५वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला. अथणी येथील रूगणालयाच्या समोर चप्पल दुकान होते.शुक्रवारी सकाळी सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी, नातेवाईक यांना समजली.बातमी समजताच नातेवाईक शेजारी घरी आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल या भीतीमुळे सगळ्यांनी दूर उभं राहूनच अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. मात्र मृत्यदेह तिथेच राहिला.शेवटी त्या व्यक्तीच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला.मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली त्या दुःखी पत्नीने हातगाडीवर मृतदेह उचलून ठेवला नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानभूमीत मृत्यदेह नेला.सगळे बघत राहिले पण एकही जण त्या पती गमवलेल्या महिलेच्या मदतीला आले नाही.शेवटी स्मशानभूमीत देखील पत्नीनेच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.या घटनेने पुन्हा एकदा माणुसकी शेजारधर्म किंवा जवळची नाती या शब्दांवर विश्वास ठेवावा की नाही हा विचार करण्यासाठी भाग पाडले आहे.
*म्हणून मी म्हणतोय की माणुसकी हरपली,मृतदेहा जवळ ना तिरडी ना खांदा देणारे चार लोंक सुधा जवळ येईना असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी व्यक्त केली आहे*

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.