स्वतःची कातडी वाचवण्यासाठी गोरगरीब कामगारांचा बळी देऊ नका:- संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे





पंढरपूर // प्रतिनिधी 
स्वतःला वाचवण्यासाठी विठ्ठल जोशी नामक व्यक्ती श्री
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मधील सर्व कामगारांचा गैरवापर करत असून यामध्ये कालच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मधील काही कामगारांनी पत्र काढून विठ्ठल जोशी यांना जो गाभारा बंदी प्रवेश केला आहे हे तो सर्व मागे घेण्यात यावा नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन करू अशा आशयाचे पत्र काढून मंदिर समितीला इशारा दिला होता. पण
पण ज्या विठ्ठल जोशी नावाच्या इसमाने पवित्र अशा प्रक्षाळ पूजा दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये असलेल्या चांदीच्या तांब्याने स्वतःचीच प्राक्षाळ पूजा करून घेतली होती हे सर्व महाराष्ट्राने पाहिले असताना अशा विठ्ठल जोशींना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हे दोनच दिवसापूर्वी बडतर्फ करून प्रवेश बंदी करण्यात आली होती या सर्व प्रवेश बंदीनंतर विठ्ठल जोशींनी संपुर्णपणे कामगारांचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू केला असून या कामगारांचा बोलविता धनी कोण आहे याचा शोध घेणे आता फार गरजेचे झाले आहे याबाबत पंढरपूर येथील संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे यांनी आज असे सांगितले आहे की जर गोरगरीब कामगारांना तुम्ही त्रास देणार असेल तर संभाजी ब्रिगेड कदापि सहन करणार नाही आणि असे होऊ देणार नाही त्यामुळे विठ्ठल जोशींनी स्वतःला वाचवण्यासाठी गोरगरीब विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना पुढे करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे करणे म्हणजे विठ्ठल जोशी नावाच्या माणसाचा प्रकार अशोभनीय असून याबद्दल पंढरपूर शहर व मंदिर परिसरात यांच्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget