सोलापूर // प्रतिनिधी
तुका म्हणे पापे ऐती रोगाची रूपे सध्या परिस्थिती जगात खूप पाप वाढलेले आहे आणि म्हणून सगळीकडे रोग पसरलेला आहे आणि हा रोग नाहीसा करायचा असेल तर संतांचे आणि भगवंताचे नामस्मरण करणे एक मात्र प्रभावी साधन आहे तुका म्हणे पापे जाती संतांच्या जापे किंवा नामाच्या चिंतणे बारा वाटा पळती विघणे आणि संतांचे प्रमाण त्रीकाल ही खोटे होणार नाही.
पण आज सरकारने वारकरी संप्रदायातील साधक मंडळीला भजन-कीर्तन करण्यावर बंदी आणलेली आहे सरकारने देशी दारूची दुकाने उघडी केली, लग्नामध्ये 50 पाहुण्यांना परवानगी दिली, चित्रपट सृष्टी व्हिडिओ शूटिंग ला परवानगी मिळाली, मॉल उघडले गेले, बँकांच्या समोर कितीतरी मोठी रांग आहेत गर्दी आहे,राजकीय नेते दौऱ्यावर गेले तर सहज त्यांच्यासोबत पन्नास, शंभर लोक दिसून येतात मग वारकरी संप्रदाय वरच का हा अत्याचार संतांची परंपरा सांभाळणाऱ्या नामदेव महाराजांच्या वंशजानवर गुन्हे दाखल केले आणि संतपरंपरेचा अपमान करणाऱ्या फूबाईफू कार्यक्रमात ज्यांनी भूमिका वठवली आणि त्यांची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली त्यांच्यावर गुन्हे का नोंदवल्या जात नाहीत सध्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र वगळता देवस्थाने उघडी केलेली आहे मग महाराष्ट्राचे देवस्थान का बंद ठेवावे
मज्जित मधून लाऊस स्पीकर मधुन दिवसातून पाच वेळा नमाज पडल्या जात आहे आमचा कोणत्याही धर्माला अजिबात विरोध नाही त्यांनी त्यांचे कार्य जोरात करावे पण मंदिरावरील लाऊड स्पीकरवर भजन-कीर्तन केले तरच तुम्ही ध्वनी प्रदूषण होते असा आक्षेप का घेता व वेळेचे बंधन हिंदू ला च का कायदा हा सर्वांन करीता सारखा असावा यावरून सिद्ध होत आहे की सरकारचा करोणा संकटाचे नाव समोर करून हिंदू धर्माच्या वारकरी संप्रदायातील चालीरीती व मंदिर बंद पाडण्याचा कट दिसून येत आहे
या विषयावर आम्ही वेळोवेळी सरकारला मेलद्वारे पत्रव्यवहार कोणतेही उत्तर न मिळाल्या मुळे पंढरपूर येथे आमरण करून उपोषणाचा इशारा दिलेला आहे
आमरण उपोषणाला बसनारी महाराज मंडळी
ह भ प अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष,
ह भ प श्री गणेश महाराज शेटे युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष
जगन्नाथ महाराज देशमुख विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष,
ह भ प तुकाराम महाराज चवरे
विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष ( जेष्ठ )
ह भ प तुकाराम महाराज भोसले
विश्व वारकरी सेना संपर्क प्रमुख
ह भ प श्री सुधाकर महाराज इंगळे अखिल वारकरी भाविक मंडळ संस्थापक अध्यक्ष
मागण्या पुढील प्रमाणे
१) नामदेव महाराजांच्या वंशजांन वर पंढरपूर येथे गुन्हे दाखल केले ते त्वरित मागे घेण्यात यावे
२) श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमी पासूनच भजन-कीर्तन करण्याकरिता किमान ५० भाविकांना नियम व अटी लावून परवानगी देण्यात यावी
३) झी मराठी या वाहिनीवर फु बाई फु या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे, ऋषिकेश जोशी ,लीना भागवत यांनी कीर्तन परंपरेचा अपमान केल्याबद्दल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी
४) ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा
५) महाराष्ट्रातील देवस्थाने नियम अटी लाऊन ऊघडन्यात यावे
६) लाऊस्पीकर चा नियम मंदिर मज्जीत करिता एक सारखा असावा
महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येणे फार महत्त्वाचे आहे आपण आज संघटित झालो नाही तर भविष्यात कोणीही या कार्यातून पुढे पाऊल टाकणार नाही या बाबीचा गांभीर्याने विचार करावा
अर्जामध्ये ज्यांची नावे दिलेली आहेत फक्त ती महाराज मंडळी महा क्षेत्र पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि महाराष्ट्रभरातून इतर वारकरी संघटना भजनी मंडळ रितसर त्यांच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन देऊन चार ते पाच भाविक सोशल डिस्टन्स ठेवून शांततेच्या मार्गाने दिनांक 30 तारखेला भजन आंदोलन करणार आहेत तरी सरकारने वारकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होण्याआधी गांभीर्याने विचार करून वारकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करावे ही नम्र विनंती
आपला गणेश महाराज शेटे युवा विश्वभारती सेना महाराष्ट्र अध्यक्ष
जगन्नाथ महाराज देशमुख विश्व वारकरी सेना राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष
तुकाराम महाराज चवरे विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष
(टिप - महाराष्ट्रातील वारकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आमचा व्हाट्सअप नंबर वरती आहे या नंबरचा वापर फक्त व्हाट्सअप करीता करावा अति महत्वाचे काम असल्याशिवाय फोन लावू नये ही नम्र विनंती महाराष्ट्र मधुन भरपुर फोन ऐत राहतात सर्वांचे फोन उचलू शकत नाही क्षमस्व सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे.)

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.