फुलचिंचोली येथे रक्तदान शिबीर संपन्न



 सोलापूर प्रतिनिधी :- लॉक डाऊनच्या काळात गरजू लोकांना धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटपच्या उपक्रममानंतर आता रक्तदान शिबिर राबवण्याचा निर्धार मनसेने हाती घेतला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप ( बापू) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या हस्ते या अनोखी मोहीमेची सुरुवात होत असून पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे।.



यावेळी दिलीप धोत्रे बोलताना पुढे म्हणाले की; कोरोना महामारिच्या संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्ह्यातील गरजू लोकांना लॉकडाऊन (संचारबंदी) च्या काळात अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाचा प्रसार वाढत असून रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने रक्तदान अभियान हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याचा निर्धार केला आहे.

याप्रसंगी मनसचे पंढरपुर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, रमाकांत ( नाना ) पाटील, माजी सरपंच मारुती वाघ, राजा शिवछत्रपती परिवाराचे प्रमुख सुरज पाटील, भीमा साखर चे संचालक बिभीषण वाघ, समाधान वाघ, मोहन दांडगे, राहुल डोंगरे, हिम्मत नागने,सोमनाथ कुंभार, सोमनाथ अवताडे, विश्वनाथ शिंदे, खंडू हजारे, डॉ, प्रसाद खाडिलकर, डॉ, किलमिसे,सिद्धेश्वर तोरखंडे, इत्यादी उपस्थीत होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget