सरपंचाच्या भावाने केला कट रचून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून आरोपी फरार




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

शिरपूर जैन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी गावामध्ये शेतातील गोठयाजवळचा नाला उपसण्यावरून सरपंच बापूसाहेब वाळूकर यांच्या भावाने केला क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला,वैभव मोरे यांनी शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये दशरथ संपत वाळूकर यांच्याकडून सतत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली जाते शिल्लक कारणावरून नेहमी वाद घालत असतात वैभव मोरे यांच्या शेतात लागून पांदन रस्ता आहे व त्या बाजूला दशरथ संपत वाळुकर यांचे शेत आहे दोन्ही शेताच्या मधातून पांदन रस्ता आहे ३०/०६/ २०२० रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी वैभव मोरे शेतात जात असताना दशरथ संपत वाळुकर हे वैभव मोरेच्या शेताकडील बाजूची नालामधील माती गोटे उपसत होते ,वैभव मोरे यांनी त्यांना विचारले की आमच्या जवळील नाली तुम्ही का उपसत आहात तुम्ही ति नाली उपसू नका आम्ही आमची नाली उपसून घेतो,हे ऐकताच दशरथ वाळूकर यांनी वैभव मोरे यांना शिवीगाळ करणे सुरू केले काही न ऐकता त्यांनी वैभव मोरे यांच्या छातीवर काहीतरी आणिदार धारदार शस्त्राने वार केला,व आरोपी दशरथ वाळूकर यांच्या पत्नी कावेरी दशरथ वाळूकर यांनी शिवीगाळ केली, पुन्हा जर माझा नादाला लागशील तर तुला जीवे मारून टाकील अशी धमकी आरोपी दशरथ वाळूकर यांनी वैभव मोरे यांना दिली,त्यामुळे वैभव परशराम मोरे यांनी दशरथ संपत वाळूकर व कावेरी दशरथ वाळूकर यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला व जीवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून दशरथ संपत वाळूकर व कावेरी संपत वाळूकर यांचावर कलम ३२४,५०४,५०६,३४, भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जमादार सरणाईक यांनी जोगेश्वरी येथे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता आरोपी दशरथ संपत वाळूकर व पत्नी हजर नव्हते त्यांना दुसऱ्या दिवशी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले असता आरोपी आले नाहीत त्यामुळे आरोपी फरार आहेत असे समजते पुढील तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सरणाईक हे पुढील तपास बघत आहेत

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget