वृत्तसंस्था // प्रतिनिधी
देशातील कोरोना बाधितांचा आकडा छातीत धडकी भरवणारा आहे. कोरोना रूग्णांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन दिवसरात्र काम करतंय. मात्र बिहारमध्ये एका गर्भवती महिलेसोबत असा काही प्रकार घडलाय की आसपासच्या नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला.
राजपूरमधील सखुआना गावात एक गर्भवती महिला राहत होती. प्रसुतीकळा सुरू होताच या गर्भवती महिलेच्या पतीनं तीला रूग्णालयात दाखल केलं. मात्र महिलेची परिस्थिती खालावली असल्यानं डाॅक्टरांनी प्रसूती करण्यास साफ नकार दिला.
महिलेच्या पतीनं तीला दुसऱ्या रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी तीची सुखरूप प्रसूती झाली. मात्र बाळाची प्रकृती फारच नाजूक झाली. या हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी बाळाला ट्रेमध्ये ठेवत, पतीच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर दिला.
एका दुसऱ्या दवाखान्यात बाळाला घेऊन जा असा सल्ला डाॅक्टरांनी यावेळी दिला. बाळाला तसंच ट्रेमध्ये घेऊन या दाम्पत्यानं अनेक धावाधाव केली, मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं या बाळाचा दुःखद मृत्यू झाला. या दाम्पत्याचा बाळाला ट्रेमधून घेऊन जातानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.