वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार व त्यांचा मुलगा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अभिमन्यू पवार यांच्या घशात खवखव होत होती. ही कोरोनाची लक्षणं असल्यानं त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. चाचणीनंतर ते कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं.स्वतः अभिमन्यू पवार यांनी ही माहिती दिली आहे, त्यांनी यासंदर्भात काही ट्विट केले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.