प्रथमवर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेस 10 दिवस मुदतवाढ



सोलापूर // प्रतिनिधी 

येथील फॅबटेक पॉलिटेक्निक ( डिप्लोमा ) कॉलेजमध्ये शै.वर्ष  २०२०-२१ करिता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक १० ऑगष्ट पासून प्रथम वर्ष डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून  त्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणार वेळ व आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे म्हणजेच नॉन क्रिमेलियर, डोमेसाइल इ.  मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे यामध्ये 10 दिवसांनी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी पुढे अजून वेळ न दवडता आपली प्रवेश प्रक्रिया करून घ्यावी अशी  माहिती कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार उपस्थित होते.


प्रवेशाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष  डिप्लोमा  इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेसंबंधीची माहिती,प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, दहावीनंतर डिप्लोमा  अभ्यासक्रमाचे फायदे, तसेच  फॅबटेक पॉलिटेक्निक  कॉलेजमधील उपलब्ध सोयी सुविधा याबद्दलची सविस्तर माहिती ८६००५४७४७८, ८४०८८८८६२८ व ७०८३१२२८५२ या नंबरवर उपलब्ध होईल

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget