राज्यात पुढचे 24 तास हलका व मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

गेल्या 3 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला असून नागरिकांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आजही राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. खरंतर आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात अशा आसमानी संकटामुळे संसर्गाचा धोका तर आहेच पण विदर्भात आलेल्या पुरामुळे अनेकांची संसार पाण्याखाली गेली आहे.


हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आज पुढील 24 तासांत काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पालघर, ठाणे, नाशिक, नगर मधील काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात काही भागात पावसाचा जोर आज ही राहील असा अंदाज आहे. तर मुंबईतही पावसाची रिपरिप सुरू असणारआहे. त्यामुळे काल थोड्या प्रमाणात पाऊस ओसरला असला तरी आज पावसाची बॅटिंग सुरूच राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


याच पार्श्वभूमीवर अनेक गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नदी आणि धरणालगतच्या गावांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. आज फक्त राज्यातच नाही तर मध्य प्रदेशात तसंच गुजरात किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. केतन किनारपट्टी तसंच घाटमाथ्यावर काही भागात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget