वृत्तसंस्था // प्रतिनिधी
शेतक-यांचा शेतीमाल पाठविण्यासाठी किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा द्या.तसेच रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देण्यात यावे.केंद्रीय रेल्वे मंत्री व रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे निवेदन पाठवून ही मागणी करण्यात आली. सध्या आठवड्यातून एक दिवस धावणारी किसान रेल्वे ही शेतक-यांच्या सोयीसाठी दोन दिवस शेतीमाल घेवून जाणार आहे.रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेवून भारत सरकार सोबत चर्चा करून किसान रेल्वेची वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे.जेणेकरून या योजनेमुळे या भागातील शेतक-यांना त्यांचा नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी किसान रेल्वे सुरू केलेली आहे.नुकतीच सांगोल ते दानापूर ही शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू झाली आहे.ही रेल्वे माढा तालुक्यातील मोडनिंब या मार्गक्रमण करीत आहे.मोडनिंब या ठिकाणातून पंढरपूर तालुक्यातील करकंब, बार्डी, जाधववाडी, पांढरेवाडी,भोसे,बावी,पडसाळी या भागातील फळबागांचे उत्पादन होत असून त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बोर,डांळिब लिंबू, द्राक्ष,पेरू,व इतर पालेभाज्यांचा समावेश करावा.सांगोला ते दानापूर या किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा.नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल विक्रीला पाठविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.त्यांचा माल इतर मार्गाने विक्रीस पाठविण्याल्यामुळे वाहतुकीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. त्यांना चांगला दर देखील मिळत नाही.त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.तसेच मोडनिंब रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल ठेवणयासाठी अडचणी येत आहोत.त्यामुळे परिणामी शेतकरी व व्यापारी यांच्याकडून यांच्या कडून किसान रेल्वेस थांबवण्या यावी.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य व माढा तालुकाचे आमदार बबनराव शिंदे आणि मोडनिंब भागातील नागरिक व शेतकरी आणि व्यापारी,संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे निवेदनाव्दारे आणि मेलव्दारे केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.