पार्थ पवार 2 तास 'सिल्व्हर ओक'वर, मात्र शरद पवारांसोबत चर्चा झालीच नाही?


वृत्तसंस्था // प्रतिनिधी  

पक्षाच्या भूमिकेशी विसंगत मत व्यक्त केल्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र गुरुवारी रात्री पार्थ पवार हे सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.


यावेळी पार्थ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत तब्बल दोन तास बैठक झाली. या बैठकीत पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांत सिंह प्रकरणात विधान का केलं, याविषयी भूमिका मांडल्याची माहिती आहे. मात्र यावेळी पार्थ यांची शरद पवार यांच्याशी थेट चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


पार्थ पवार आज जाहीर करणार भूमिका?


पुण्यात गेल्यावर आज पार्थ पवार सर्व वादाविषयी आपली भूमिका जाहीर करतील. सु्प्रिया सुळे यांच्या भेटीनंतर आता पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही चर्चा करणार असल्याचं समजतं. काका, आत्या अशा ज्येष्ठ मंडळींसोबत चर्चा करून पार्थ आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget