सोलापूर // प्रतिनिधी
विश्ववारकरी सेना तसेच विविध वारकरी संघटनांच्या ₹वतीने आयोजित श्री विठ्ठल मंदिर सह अन्य मंदिर दर्शन, भजन करण्यासाठी खुले करण्यात यावे या प्रमुख मागणी करिता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी लाखो वारकऱ्यांसोबत श्री विठ्ठल मंदिरमध्ये प्रवेश करणार आहेत. सदर श्री विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पत्रकाच्या 30 हजार प्रती वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्हा यांच्यावतीने छापण्यात आल्या असून त्यांचे वाटप संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यामधील सर्व तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात येणार असून सोलापूर मध्ये पत्रक लावण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.