1 लाख वारकरी यांच्या उपस्थितीत करणार मंदिर प्रवेश
सोलापूर // प्रतिनिधी
विश्व वारकरी विश्वातील वारकरऱ्यांचे आदराचे स्थान असणाऱ्या पंढरपूर येथील पंढरपूर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिर उघडण्यासाठी मी स्वतः विश्व वारकरी संप्रदाय बरोबर सहभाग होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व वारकरी संप्रदाय मंडळांनी कृपया याची नोंद घ्यावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाबे आंबेडकर यांनी केलेली आहे तरी
महाराष्ट्र हरी भक्त पारायण महाराज व विश्व वारकरी सेनेने कीर्तन,भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट आंदोलनाची भूमिका घेतली आहे तरी या आंदोलनाला आम्ही स्वतःहजर राहून पाठिंबा देणार आहे.तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील विविध मंडळांनी आपला सहभाग व विश्व वारकरी सेना तसेच इतर सामाजिक संघटनेने पाठिंबा दर्शवित उपस्थित राहावे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.