क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर दरोडेखोरांचा प्राणघातक हल्ला; काकांचा मृत्यू, 4 सदस्य जखमी

 




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या काकांच्या कुटुंबावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्यात रैनाच्या काकाच्या निधन झाले. तर काकीसह कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याच कारणामुळे रैनाने आयपीएलमधून माघार घेत भारतात परतल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ''काले कच्छेवाला'' टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या उद्देशाने आले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. तर अशोक कुमार यांच्या 80 वर्षीय मातोश्री सत्या देवी, पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कौशल जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरातील काही रोकड आणि सोने लुटून दरोडेखोरांनी पळ काढला.

सुरेश रैनाची ‘आयपीएल’मधून माघार

''सुरेश रैना खासगी कारणामुळे भारतात परतला आहे. तो आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्ज या काळात रैना आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहे'' असं CSK ने ट्विट केले होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget