वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मंगळवेढा येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले आसता यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. शहरातील मध्यमवर्गीय असलेली जुनी पूर्वीची पोलिस वसाहत आहे. त्या ठिकाणी पोलिस व त्यांचे कुटुंबीय राहत होते परंतु तेथील खोल्या भिंती ना दुरूस्त आहेत तेथील अवस्था खुपच वाईट आहे अशा निरमणुष्य असल्याने ती वसाहत सध्या बंद आहे.
ती जागा उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून ती मोडकळीस आलेल्या खोल्या व तो परिसर वसाड पडला आहे तरी या पोलिस वसाहतीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दूर्लक्ष आहे.
सध्या सेवा बजावण्यासाठी परगावाहून पोलिस कर्मचारी मंगळवेढा येथे येत असतात ईथे आल्यानंतर पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होत आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून आपले प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहे. अशा कितीतरी प्रसंगाला तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत पोलिस कर्मचारी व कुटुंबियांची राहण्याची गैरसोय होत आहे अशा विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दामाजी मारुती मोरे, व सर्व बळीराजा शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे निवेदन देताना मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.