वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन! असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया! कोरोनाचं संकट आजवरचं सर्वात मोठं संकट असून पुढचे काही महिने प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढूया, कोरोनाला हरवूया! सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारीच्या भावनेतून कोरोनाचा प्रसार रोखणं, देशवासियांचे प्राण वाचवणं, याला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं सर्व देशवासियांनी स्वत:चा, कुटुंबाचा, इतरांचाही कोरोनापासून बचाव करुन कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्यावं. हीच आजच्या घडीची सर्वात मोठी देशसेवा! देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी आहे.
ती पार पाडण्यासाठी आजवर अनेक सुपुत्रांनी सर्वोच्च त्याग केला. अमूल्य योगदान दिलं. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी योगदान दिलं आहे. हे योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करूया! उपस्थित विर पिता तानाजी होनमाने रानुबाई होनमाने सरपंच स्वाती कोडंकर प्रभाकर गावडे माजी सरपंच लक्ष्मण पांढरे शिवाजी शेंडगे राजू गावडे भिवा शेंडगे मोहन गावडे विनायक पाटील तानाजी पांढरे सर्जेराव होनमाने लिगादेव निळगुंडे बंडू बाबर बापु शिंदे ग्रामसेवक आर पी कोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे सदस्य राजु माने जयराम पाटील नवनाथ गोरे पांडुरंग म्हमाणे हमीद मुलाणी सतिश गोरे समाधान होनकळस सतिश चव्हाण शशिकांत कांबळे संताजी भोसले केंद्रप्रमुख ब्रम्हदेव घाडगे मुखधापक तुकाराम गायकवाड शिक्षक विठ्ठलराव टाकळे सचिन निरगिडे सिद्धेश्वर भुई विनोद राजमाने सागर सोनवले उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.