फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यदिन सामाजिक बांधिलकी जपत साजरा



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये १५ ऑगस्ट दीन  देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय  पध्दतीने साजरा करण्यात आला. आज पूर्ण देशाला ज्या महाभयंकर अशा कोरोनाच्या संकटाने घेरलेले असताना काटेकोरपणे साऱ्या नियमांचे पालन करीत म्हणजेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत  फॅबटेकमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला . सकाळी ८ वाजता फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री . भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करून ध्वज सन्मानाने फडकविण्यात आला.
नंतर राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून नागरिकांना वाचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता देशातील लोकांना सुरक्षित ठेवणारे डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशिअन, फार्मासिस्ट पोलीस, व सफाई कर्मचारी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळेने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. या दिनाचे औचित्य साधून सांगोला शहरातील डॉ.संजय दौडे  (आरोग्य अधिकारी न. परिषद सांगोला) डॉ. प्रफुल्लकुमार चौधरी (दंतवैद्य), सहकारी  श्री.अमित कोरे (अभियंता), अरुण कोळी (आरोग्यसेवक), श्री निशिकांत पापरकर (लॅब टेक्निशिअन) यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्याचा प्रयत्न  फॅबटेक पब्लिक स्कूलने केला. देशाच्या या स्वातंत्र्यदिनी आपल्या देशाला कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मानवीरांसाठी कृतज्ञता व्यक्त केली गेली व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मास्क चे वितरण करण्यात आले. असा हा अविस्मरणीय  स्वातंत्र्यदिन शाळेमध्ये साजरा केला.
या कार्यक्रमासाठी फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, संचालिका सौ. सारिका रुपनर, कॅम्पस डायरेक्टर संजय  अदाटे, इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे, पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, जूनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. राजकुमार गावडे व  उपस्थित राहिले. या कार्यक्रमासाठी सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या शिल्पा कोळेकर  यांचे मार्गदर्शन लाभले तर उपस्थित शिक्षक वृंद व शिक्षकेतर  कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील  शिक्षक  निसार इनामदार  यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget