पंढरपूर प्रतिनिधी :- तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार डिप्लोमा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सोमवार दिनांक 10 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. त्यासाठी न्यु सातारा पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी तालुका पंढरपूर येथे अधिकृत सुविधा केंद्र(FC) उपलब्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे व कागदपत्रांची स्कॅन छायाप्रत अपलोड करणे असा पहिला टप्पा असणार आहे. यासंबंधीचे संपूर्ण वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेले आहे. प्रथम व द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी पंढरपूर येथील अधिकृत सुविधा केंद्रा वरती जाऊन नोंदणी अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन मा. प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी न्यु सातारा च्या अधिकृत सुविधा केंद्राशी(FC)९३२६११७०४०,९६०७६८६६४८,९९७५७६३८४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.