धुळे येथील विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जाहीर निषेध





सोलापूर  प्रतिनिधी:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या चुकीच्या विरोधात व विद्यार्थ्यांच्या भरमसाठ वाढीच्या विरोधात काल धुळे येथे मंत्रीमहोदय अब्दुल सत्तार यांचे समोर आंदोलन करत असताना आंदोलन आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांवर सत्तेचा गैरवापर व पोलिस बळाचा वापर करत अमानुषपणे प्रचंड मारहाण करून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आशा संवेदनाशील महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध व धिक्कार करण्यात येत असून याप्रकरणी का मावशी आणि क्रूर मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्री अब्दुल सत्तार यांनी तत्काळ राजीनामा देण्यात यावा. तसेच ज्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी.

अशी मागणी मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


सदरची निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले.

महत्त्वाची बाब म्हणजे कोरूना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक आर्थिक अतोनात नुकसान झाले सर्व प्रकरणी शासनाने विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या पैकी मंजूर करून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी खालील आशयाच्या मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्लक परत करण्यात यावे चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्कात 30% कपात करावी चुकीच्या लागलेल्या निकालाची पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. या किरकोळ मागण्या मंत्री महोदय ना. अब्दुल सत्तार यांना सांगण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत असता त्यांना पोलीसां मार्फत माणूस मारहाण करण्यात आली. 


यावेळी निवेदनादनावर मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे, संजीव खिलारे, गुलाबराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget