शेवटी अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्र आलेच; पुण्यात कोविड हॉस्पिटलचे उदघाटन


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बाणेरमध्ये उभारलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटलचे उदघाटन झाले.


दरम्यान, हॉस्पिटलच्या आवारात होणाऱ्या कार्यक्रमाला पवार, फडणवीस यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, दोन्ही शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख उपस्थित होते. 


पुण्यातील पहिल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला पवार यांच्यासह सर्वक्षीय नेते उपस्थितीत होते. मात्र, फडणवीस नसल्याने राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मात्र फडणवीस येणार असल्याचे निश्‍चित झाले. त्यानिमित्ताने पवार-फडवीस हे नेमका बोलणार? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget