प्रभाकर भैय्या देशमुख यांनी जागवल्या सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणी



सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व सहकाराचे महामेरू स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांना तमाम जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने व मी स्वतः त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करत आहे. तसेच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालकांच्या खूप आठवणी आहेत पाटकुल गावचे ज्येष्ठ नेते डीसी सी बँकेचे माजी संचालक स्वर्गीय शिवाजीराव नारायण भाऊ देशमुख यांचे पन्नास वर्षापासून च्या ऋणानुबंधाचे नाते संभाळून तसेच महेश देशमुख यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून  माझे बंधू डॉक्टर जयवंत देशमुख यांच्या लग्न सोहळ्यासाठी सुधाकर परिचारक मालक एवढे वय झालेला असताना सुद्धा 13 लग्ने उरकून या 14व्या लग्न सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले.पाटकुल येथील देशमुख व कासेगावचे देशमुख यांच्या पंढरपूर येथील लग्न समारंभाला उपस्थित राहून दोन्ही परिवारांना त्यांनी आशीर्वाद दिला होता. त्यावेळी उत्साहाने व आनंदाने व मोठ्या मनाने माझा म्हणजेच मा.प्रभाकर भैय्या देशमुख यांचा फेटा घालून सत्कार केला होता.त्याप्रसंगी मोहोळच्या पंचायत समितीच्या तत्कालीन उपसभापती साधना देशमुख प्रभाकर भैय्या देशमुख व कर्तव्यदक्ष सध्या गडचिरोली येथे जिवाचा विचार न करता सेवा करणारे व देशप्रेमाने भारावलेले मा पोलीस उपनिरीक्षक प्रवीणजी देशमुख व त्याच्या पत्नी सौ अनुपा देशमुख आम्ही सर्व लग्न सोहळ्याप्रसंगी होतो.परिचारक मालक लग्नात आल्यानंतर  प्रवीण साहेबांच्या पत्नी अनुपा यांचे पिताजी श्रीपूर येथील पांडूरंग साखर कारखान्यामध्ये नोकरीला होते ते लक्षात ठेवून परिचारक मालकांनी आवर्जून पवार कुटुंबियांची विचारपूस करतानाचे हे टिपलेले छायाचित्र. त्यामुळे परिचारक मालकांची स्मरण शक्ती त्यांचा अभ्यास याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करतो.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget