दहिगाव उपसा सिंचन योजनेची आ. संजयमामा शिंदे यांनी केली पाहणी.

 




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

उजनी धरणामध्ये जवळपास 90 टक्के च्या आसपास पाणीसाठा झाल्यामुळे ओव्हर फ्लो चे आवर्तन सुरू करणे प्रस्तावित आहे. आवर्तन सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. तसेच दुपारी बोगद्याच्या कामकाजाची पाहणी केली.


दहिगाव ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे या योजनेला अनेक मर्यादा पडतात.आवर्तन कालावधीत अनेक अडथळे येतात त्यामुळे आ.शिंदे यांनी दहीगाव व कुंभेज येथील पंपगृह व परिसर याची पाहणी केली. तसेच वितरणकुंड क्र. 2 , खडकेवाडी ते घोटी या मुख्य कॅनॉलवरच्या सौदे , सरपडोह , वरकटने , फिसरे ,घोटी , साडे इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेतल्या . सोलापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत कुकडी डावा कालवा क्र.12 च्या माध्यमातून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कामकाज चालते. या योजनेसाठी यांत्रिकी विभाग , जलविद्युत विभाग व स्थापत्य विभाग या तीनही विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबरच महावितरणचे उपअभियंता यांच्याशी आमदार शिंदे यांनी संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व आवर्तन कालावधीत विनाअडथळा आवर्तन पार पडण्याच्या सूचना केल्या.


दुपारी कृष्णा मराठवाडा महामंडळांतर्गत मराठवाड्याला पाणी देण्यासाठी उजनी ते कोळगाव धरण यादरम्यान करमाळा तालुक्यात बोगद्याचे काम सुरू आहे. जेऊर, सरपडोह ,सौंदे , शेलगाव ,अर्जुननगर याठिकाणी या बोगद्याच्या शाफ्ट आहेत . यापैकी अर्जुननगर या शाफ्टला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली तसेच प्रत्यक्षात बोगद्यामध्ये खाली उतरून कामकाजाची पाहणी केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget