'संयम सुटला तर सरकारला शॉक देऊ', वाढीव वीज बिलांवरून राजू शेट्टी भडकले


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमध्ये घटकपक्ष आहे. मात्र हेच राजू शेट्टी आता सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून सरकारविरोधात उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर आता राजू शेट्टी हे वीज बिलांबाबतच्या तक्रारींबाबत सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.


'कोल्हापूरमध्ये आज वीज बिलांबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला रोजगार नाही. या काळात ग्राहकांनी जास्त वीज वापरली का नाही? याची खातरजमा न करता, त्यांना वाढीव वीज बिल पाठवले आहे. ही वीज बिल सरकारने माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संयम सुटला तर सरकारला शॉक देवू,' असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget