पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोनाच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले पाच-सहा महिने झाले सर्व महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व व महत्वाची मंदिरे प्रार्थनास्थळ व देवालय ही राज्य शासनाने बंद केली होती आता कोणाचा संसर्ग हा हळूहळू कमी होत आहे. व रुग्ण संख्या झपाट्याने कमी होण्याच्या मार्गावर असताना ही सर्व मंदिरे व प्रार्थना स्थळे महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारने लवकरात लवकर सुरू करावीत यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये हे उद्धवा अजब तुझे सरकार या टॅगलाइन खाली भाजपने भव्य असे आंदोलन घेतले असून हे आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुद्धा पार पडले. समस्त वैष्णवांचा जिथे महा मेळा भरतो ते तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा आता उद्धव ठाकरे सरकारने सुरू करावे व सर्वजण माणसाचा आदर करावा अशी मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली आहे.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्रीकांत (दादा) देशमुख, पंढरपूर मंदिर समितीच्या सदस्य व नगरसेविका शकुंतला नडगिरे, शंतनू दंडवते बादलसिंह ठाकूर,दत्तात्रेय रजपूत, भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूरचे विदुल अधटराव,रामभाऊ जगदाळे,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.