वृत्तसंस्था // प्रतिनिधी
शेतक-यांचा शेतीमाल पाठविण्यासाठी किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा देणेबाबत व रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देणेबाबतची मागणी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे आ.बबनराव शिंदे यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेवून भारत सरकार सोबत किसान रेल्वे ही वाहतुक व्यवस्था सुरू केली आहे. जेणेकरून या योजनेमुळे शेतक-यांना त्यांचा नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी शेतीमाल किसान रेल्वे सुरू केलेली आहे. नुकतीच सांगोला ते दानापूर ही शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू करण्यात आलेली असून सदर रेल्वे मोडनिंब,ता.माढा या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे. माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोठ्या बाजारपेठेसाठी पूर्वीपासून परिचित आहे. मोडनिंब परिसरामध्ये फळ बागांचे उत्पादन होत असून त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बोर, डाळींब,लिंबू,द्राक्ष,पेरू व इतर पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येत आहे. सांगोला ते दानापूर या किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल विक्रीसाठी पाठविणे अडचणी निर्माण होत आहे. त्यांचा माल इतर मार्गाने विक्रीस पाठविल्यामुळे वाहतुकीसाठी जादा पैशे मोजावे लागत असून त्यांना चांगला दर देखील मिळत नाही.त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.तसेच मोडनिंब रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल ठेवण्यासाठी अडचणी येत असून परिणामी शेतीमाल खराब होवून नुकसानी होत आहे.त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांचेकडून किसान रेल्वेस थांबा मिळणेसाठी वारंवार मागणी होत आहे.
सांगोला-दानापूर या रेल्वेस मोडनिंब रेल्वे स्थानकावर बस थांबा मिळाल्यास मोडनिंब व परिसरातील शेतक-यांचा ताजा शेतीमाल वेळेत विक्रीसाठी पाठविणे सोईचे होवून त्यास चांगला दर मिळणार आहे. तसेच मोडनिंब येथून दैनंदिन विक्रीसाठी जाणारा शेतक-यांचा कमी व अधिक प्रमाणातील माल रेल्वेने वाहतुकीसाठी स्विकारणे व शेतीमाल साठविणेसाठी रेल्वे स्थानकावर गोडावून उपलब्ध देणेबाबत आ.बबनराव शिंदे यांचेकडून संबंधित भारतीय रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे करण्यात आली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.