वृत्तसंस्था // प्रतिनिधी
करोना व्हायरसचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. करोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) चिंता वाढविणारे इशारा दिला आहे. यूरोपसह जगभरातील अनेक भागात हिवाळ्यात करोनाची मोठी लाट येईल, अशी शक्यता डब्लूएचओ वर्तवली आहे. लोकांना हिवाळ्यापूर्वी तयार राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओच्या युरोपीय क्षेत्रात ५५ पेक्षा ३२ राज्यांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये १४ दिवसांच्या कालावधीत करोना बाधितांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु, आता आरोग्य अधिकारी फेब्रुवारीच्या तुलनेत अधिक तयार आणि मजबूत स्थितीत आहेत. जगभरातील देशांनी या चेतावणीनुसार आताच तयारी सुरू करायला हवी, असेही हेनरी क्लग यांनी सांगितले आहे.
दरम्यान, डब्ल्यूएचओने सांगितले की, त्यांनी एक कमेटी बनवली आहे. जी आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यासंदर्भातील नियम तयार करेल. करोना व्हायरसला रोखण्यासाठी संघटनेने ठोस पावले न उचलल्याची टीका जगभरातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.