वृत्तसंस्था प्रतिनिधी:- राह के पत्थर से बढ़ कर कुछ नहीं हैं मंज़िलें
रास्ते आवाज़ देते हैं सफ़र जारी रखो.
सुप्रसिध्द हिंदी आणि ऊर्दू शायर, साहित्यातील विद्वान राहत इंदौरी यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दु:ख झाले. त्यांच्या परीवाराच्या दु:खात मी सहभागी आहे, त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो ही इश्वर चरणी प्रार्थना…!
सुप्रसिध्द शायर राहत इंदौरी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राचे मोठ नुकसान झाले आहे. ही पोकळी भरून येणे शक्य नाही. राहत इंदौरी यांनी आपली शायरी आणि शायरी सादरीकरणाचा अंदाज यामूळे देश आणि विदेशात लाखो चाहते निर्माण केले. कोरोना बाधीत झाल्या नंतर त्यांचा उपचार सुरू होता, आज सकाळी त्यांनी केलेले व्टिट हे त्यांच्या चाहत्यासाठी दुदैवाने शेवटचे ठरले.
प्रतीभा संपन्न असलेले शायर राहत इंदौरी यांनी आपल्या शायरीतुन परखड आणि स्पष्टपणे वास्तव मांडणी केली. साहित्य आणि कला क्षेत्रातून सामाजिक हीत आणि विधायक राजकारणाला दिशा देणारी मांडणी करून साहित्य आणि कलेला वेगळी उंची त्यांनी प्राप्त करून दिली. त्यांची शायरी त्यांच्या चाहत्याच्या मनात कायम घर करून राहील यात तीळमात्र शंका नाही.
सुप्रसिध्द हिंदी आणि ऊर्दू शायर राहत इंदौरी यांच्या निधनाने साहित्य, कलेसोबत सामाजिक चळवळीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, त्यांना पुनश्च भावपूर्ण आंदराजली…!

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.