राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू (बापू ) पाटील यांचं कोरोनामुळे दुःखद निधन

 


पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू (बापू) पाटील यांचे कोरोनामुळे सोलापुरातील आश्विनी रूग्णालयात निधन झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता सोलापुरातील आश्विनी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.


 

राजकारणात आपला दबदबा ठेवणारे भोसे गावचे पाटील कुटुंबीय दहा दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळून आले होते. 

पहिल्यांदा राजु (बापू) पाटील यांच्या चुलत्यांचे निधन झाले. 


 धक्कादायक म्हणजे तालुक्याचे नेते राजू (बापू) पाटील यांचे देखील कोरोनाने आज मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान निधन झाले.

दहा दिवसाच्या अंतरात एकाच कुटुंबातील तीन कर्ते पुरुष कोरोनाने बळी गेलेत. पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद घटनेने तालुक्यात देखील शोककळा पसरली. त्यांच्या अचानक जाण्याने पंढरपूरच्या राजकारणामधील एक जाणकार नेता गेल्याची भावना आता व्यक्त होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget