वृत्तसंस्था // प्रतिनिधी
एका मुलाखतीत संजय राऊत यांनी डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर संजय राऊत यांनी डॉक्टरांचा अवमान केल्याचं म्हणत समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने केली आहे. मात्र राऊत यांनी आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून यु टर्न घेतल्याचं दिसून आलंय.
मी WHO बद्दल बोललो, याचा अर्थ इथल्या डॉक्टरांचा अपमान केला असं नाही. मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे. मी WHO बोललो मीच काय, ट्रम्प, रशिया किंवा अन्य देशांनीही WHO वर बोट ठेवलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
राज्यातील डॉक्टरांचा नाराजीचा सूर लक्षात येताच संजय राऊत डॉक्टरांविषयी केलेल्या ते वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतय.
डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं. मी तर नेहमी कंपाउंडरकडून औषध घेतो. WHO ला काय कळतं. सीबीआयसारखेच आहे ते इकडून-तिकडून मोणसं गोळा केलेली असतात. WHOच्या नादाला लागले म्हणूनच कोरोना वाढला आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.