"पंतांनी" शेतकऱ्यांसाठी बैलपोळा सणांच्या हप्त्यांच्या चेकवर शेवटची सही केली
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा, आधारस्तंभ, मोठे मालक सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाले. महाळुंग श्रीपुर परिसरातील जनतेला त्यांची एक वेगळी ओळख होती. ही बातमी सोशल मीडिया मधून समजतात महाळुंग श्रीपुर परिसरातील सर्व
ग्रामस्थांनी शिवाजी चौक येथे
सकाळी 10 वाजता त्यांच्या प्रतिमेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गावच्या वतीने सरपंच उषाताई भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला.
परिसरातील सर्व व्यापारी मंडळींनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहेत. तसेच पांडुरंग सहकारी साखर
कारखान्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी कामगारांच्या वतीने देखील कार्यालयासमोर सुधाकर पंतांच्या फोटोलाश्रद्धांजली अर्पण केली. श्रीपुर मधील सर्व व्यापारी, डॉक्टर्स, ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरीजचे सर्व अधिकारी, कर्मचारी, परिसरातील पंतांवर प्रेम करणारे सर्व नागरिक,
वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे, संघटनांचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी बैलपोळा सणांच्या हप्त्याची चेकवर शेवटची सही करून गेले
कोरोनाच्या काळात देशाची आर्थिक उलाढाल ठप्प असताना सुद्धाया बळीराजाने
आपल्या शेतकऱ्यांना घामाचे दाम देत असताना जी बैलगाडी माझ्या कारखाना पर्यंत ऊस वाहतूक करतो त्या बैलपोळा चे निमित्ताने पंतांनी मोठ्या उदार
मनाने 200 रुपये चा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला
आणि बैलपोळा सणांच्या दिवशी आधारवड कोसळला ….!

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.