वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याच्या कारणावरून शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे. संजय जाधव यांनी अचानक राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन समजूत काढण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परभणीतील स्थानिक पातळीवर पक्षाशी संबंधित काय समस्या आहेत, यावर देखील उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांशी चर्चा केली. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न सोडवला जाईल. तो तितका फारसा मोठा प्रश्न नाही, अशी समजूत घालून खासदारकीचा राजीनामा मागे घेण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीने संजय जाधव राजीनामा मागे घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय जाधव यांना यासंबंधित विचारले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मी वरिष्ठांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर माध्यमांशी बोलणार, असं संजय जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.